रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
आज जागतिक जीवघेण्या स्पर्धेमध्ये आपले बालक समर्थपणे टिकले पाहिजे या उदात्त हेतूने प्रत्येक पालक हाडाचे काड व रक्ताचे पाणी करून, रात्रीचा दिवस करता त परंतु दिवसाची रात्र मात्र होऊ देत नाहीत. अर्थातच त्याकरिता अहोरात्र झटून त्याच्या जीवनामध्ये कोणत्या ही गोष्टीचा अभाव राहणार नाही याची खबरदारी घेतात. त्यामुळे त्या बालकाच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीच्या अनुपलब्धीची झड न पोहोचल्यामुळे तिच्या प्राप्तीची इच्छा वा जिज्ञासा सुद्धा सुद्धा त्याच्या अंतः करणामध्ये कधी निर्माण होत नाही . परिणामी अभा वांच्या अभावाचा प्रभाव त्या बालकाच्या सर्वांगीण विका सावर पडतो आहे हे खूप मोठी धोक्याची घंटा आहे असे परखड मत भागवता चार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.ते आज श्री संत वासुदेव जी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे दिवाळीच्या सुट्टीत दर्शन व पर्यटनाच्या निमित्ताने बहुसंख्येने आले ल्या बालक व पालकांशी अनौपचारिक संवाद साध तांना प्रश्नोत्तराच्या निमित्ताने बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजच्या बालकाला भूक लागण्या आधीच नानाविध चमचमीत पदार्थ खाण्याकरिता उपलब्ध होत असल्यामुळे त्याला अन्नाची व त्याकरता लागणाऱ्या पैशाचे महत्त्व कळत नाही. प्रतिकूलतेचे चटकेच त्याला न लागल्यामुळे तो दोघां चीही नासाडी करतो.सोमवार ते शुक्रवार काम केल्यानंतरच रविवारच्या सुट्टीचे महत्त्व कळत असते . तद्वत भूक लागल्यानंतरच अन्नाची महती कळते अन्य था नाही.म्हणून त्यांना भूक कळू दिली पाहिजे. प्रत्येक पालकांनी आपल्या बालका ला राजा म्हणून वागविल्या पेक्षा त्यालाच राजा बन विण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी दुचाकी गाडी घेऊन मागितल्यास आपल्या कडे पैसा असल्यामुळे चारचाकी गाडी घेऊन देण्यास हरकत नाही. फक्त ती घेऊन देत असतांना तिच्या करता लागणाऱ्या इंधनाचा खर्च त्यांनी स्वतः उचलावा ही अट त्यामध्ये असली पाहिजे. जेणेकरून खर्च करीत असतांना पैसा कमविण्याच्या कष्टाची जाणीव त्याला होईल. त्याच्याकरिता भरपूर संपत्ती कमावून ठेवून ऐतखाऊ केल्या पेक्षा त्याला स्वतः कमाविण्याकरिता योग्य बनविले पाहिजे. म्हणून प्रत्येक सुज्ञ पालकांनी आपल्या बालकाच्या सर्वां गीण विकासाच्या दृष्टीने त्याला प्रतिकूलतेच्या चटक्यांची जाणीव होऊ दिली पाहिजे. तरच तो त्या प्रतिकूलतेवर स्वकृत्वाने मात करू शकेल.अर्थातच त्याच्या शिक्षणाबरोबरच त्याच्या सक्षमीकरणाकडे सुद्धा लक्ष केंद्रित केल्या गेले पाहिजे. म्हणजेच त्याच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्याचा शारीरिक विकास होणे सुद्धा महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्याच्या मेंदू बरोबरच मन व मनगट सुद्धा मजबूत होईल. तो विद्वत्तेबरोबरच धिरो दात्तही होईल.त्याकरिता त्याला नुसता पुस्तकी किडा न बनविता, भ्रमणध्वनी वरील खेळांपेक्षा मैदानी खेळाकरिता मुभाही द्यावी व प्रवृत्त ही करावे. त्या मैदानी सांघिक खेळामुळे त्याच्या तील नेतृत्व क्षमता विकसित होईल. तसेच त्याचे चंचलत्व चपळत्वामध्ये परिवर्तित होऊन अभ्यासातील एका ग्रताही वाढेल .अन्यथा तो पुस्तकी किडा व पतंगी जवान आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारा आयतो बाच बनेल. असे होऊ नये असे प्रामाणिकपणे वाटत असल्यास त्याला त्याच्या तील सुप्त शक्तींची जाणीव करून देण्याकरिता रामा यणातील जांबुवंताची भूमिका बजावीली पाहिजे . असा मौलिक सल्ला महाराजांनी यावेळी उपस्थित पालकांना दिल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.