वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : शासनाने रेती निर्गतीसंदर्भात तयार केलेल्या धोरणाला वाटाण्याच्या अक्षदा लाऊन तालुक्यात खुलेआम रेतीतस्करी सुरू आहे. महसूल यंत्रणेच्या नाकावर टिच्चून ही तरस्करी होत असून शिरपूर, राळेगाव, अंधुरी रेतीघाटांवर माफीयांची वक्रदृष्टी फिरली आहे.कळंब तालुका राळेगाव तालुका सध्या रेतीतस्करीत डंक्यावर आला आहे. रेतीघाटांच्या लिलावाचा प्रशासनातूनच गुंता वाढविला जात असल्याने लिलावापूर्वीच या घाटावर माफीयांनी आपले साम्राज्य उभे केले आहे. सध्या कळंबमध्ये शिरपूर व राळेगाव तालुक्यातील काही घाटांवरून रेतीची चोरटी वाहतूक वाढली आहे. रविवारी तर शिरपूरच्या घाटावरून असंख्य ट्रक- टिप्परने रेतीची वाहतूक केली जाते.राळेगावातून येणाऱ्या प्रत्येक टिप्परमध्ये दोन ब्रासच्या अधिकपट रेती आणली जात आहे. हिवरा दरणेच्या घाटामध्ये पाणी अधीक असल्याने तेथून सध्या रेती काढता येत नाही. त्यामुळे सध्या शिरपूर,राळेगाव, अंधुरी हे रेतीघाटच तस्करांच्या निशाण्यावर आले आहे. सूर्योदय ते सूर्यास्त असा रेती वाहतुकीचा नियम असताना या घाटांमधून अहोरात्र रेतीचे उत्खनन सुरू आहे. महसूल व पोलीस यंत्रणेला वाटाघाटीनुसार त्यांचा वाटा मिळत असल्याने या तस्करीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्यातूनच कळंबसह तालुक्याच्या ग्रामीण भागातही या रेतीतस्करीने कहर केला आहे. महिन्याकाठी शासनाच्या महसुलालाही मोठा चुना लागत असून, महसूल यंत्रणेतील वरिष्ठहीं यावर मौन पाळून आहे.
तालुका व ग्रामसमित्या मॅनेज
रेतीतस्करी रोखण्यासाठी मध्यंतरी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका व ग्रामसमित्यांचे गठण केले होते. मात्र, सध्या कोणत्याही गावात या समित्या अॅक्टीव्ह दिसत नाही. कळंबमध्ये छत्रपती शिवराय उड्डानपूल, राळेगाव चौफुली, खुटाळा चौफुली, राळेगाव रोड सध्या चोरट्या रेती वाहतुकीच्या दृष्टीने डंक्यावर आहे . शासकीय बांधकामातही अवैध गौणखनिज,शासकीय बांधकामामध्येही अवैध व चोरट्या रेतीचा वापर केला जात आहे. रॉयल्टीच्या नावाखाली दोन ब्रास रेती वाहतूक करणे अनिवार्य असताना अनेक टिप्परव्दारे चार ब्रासहून अधीक रेतीची वाहतूक केली जात आहे. गत दीड महिन्यात महसूल व पोलीस विभागाने रेतीतस्करीच्या एकाही वाहनावर कारवाई केली नाही हे विशेष.
रेतीघाटावरून कळंबसह राळेगाव ग्रामीण भागात ओव्हरलोड रेतीची सुसाट वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते उखडले असून सार्वजनिक मालमत्तांचेही नुकसान होत आहे. विशेष म्हणजे या ओव्हरलोड वाहतुकीकडे परिवहन विभागाचेही अक्षम्य दुर्लक्ष आहे. वाहने • भरधाव दामटली जात असल्याने अनेक अपघातांच्याही घटना वाढल्या आहे. विशेष म्हणजे वाहतूक शाखेचेही या वाहतुकीकडे कुठलेही नियंत्रण नसल्याने तसकरांचे मनोबल उंचावले आहे.










