महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : चंद्रपूर वनी आणी क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते शहरातील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांट तथा मुख्य स्मशानभूमी जवळील नगरपरिषदेचे द्वारा लावण्यात आलेल्या आनंदवन या वन प्रकल्पाचे लोकार्पण दिनांक 5 रोज शनिवार ला करण्यात आले यावेळी खासदार बाळू धानोरकर आमदार प्रतिभा धानोरकर नगराध्यक्ष अनिल धानोरकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनिष सिंग उपाध्यक्ष संतोष आमने प्रफुल चटकी सुधीर सातपुते निलेश पाटील राष्ट्रवादीचे युवा नेते मुनाफ शेख व पालिकेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते ग्रामीण रुग्णालयात नगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांट ची निर्मिती माडेल कॉर्पोरेशन कंपनी द्वारा करण्यात आली असून त्यासाठी अंदाजीत 68 लक्ष 32 हजार एवढा खर्च झाला दर मिनिटाला 250 मिली प्राणवायू निर्माण करण्याची क्षमता या फ्लॅटमध्ये असून रुग्णालयात असलेल्या 29 बेड जवळ पाईप लाईन दारा प्लांट मधून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पॉईंट दिल्यामुळे सिलेंडर बसविण्याचा प्रकार राहिलेला नाही या प्लांट ला जनरेटर जोडला असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला तरी सुद्धा ऑक्सिजन पुरवठा कोळंबा निर्माण होणार नाही या प्लांट मुळे तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही शहरातील स्मशानभूमीजवळ नगरपरिषद दारा 1000 मीटर क्षेत्रफळात तब्बल तीस हजार रुक्ष लावून व ते वाढवून अटल आनंदवन प्रकल्प उभारण्यात आला डॉक्टर अंकीरा मीयावाकी यांनी संशोधित केलेल्या जपानी पद्धतीने वृक्ष लावण्यात आले असल्यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त रुक्ष लावण्यात आले या प्रकल्प एकूण 48 झाडांच्या प्रजाती लावण्यात आले असून त्यात पिंपळ लिंबू बेहाडा सीताफळ आदी वृक्षांचा समावेश आहे या वन प्रकल्पाची निर्मिती 14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून करण्यात आली आहे शहराचा पर्यावरण समतोल राखणे प्राणवायूची मात्रा वाढविणेहा या प्रकल्पाच्या उभारणी मागील मुख्य उद्देश आहे सदर लोकार्पण सोहळयाला नगर परिषदेचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.











