महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील महेश महादेव मानकर हा चित्रकार जगातील २५ ते ३० देशांमध्ये आपल्या चित्रकारी तेचे प्रदर्शन घडवुन आपल्या भारत देशाचे चित्रकला प्रदर्शनात प्रतिनिधीत्व करत आहे. भारतीय संस्कृतीची खरी ओळख जगाला पटवून देत आपल्या भद्रावती शहराचे नाव जगात पोचवत आहे. अशा हुन्नरी कलाकाराचे भद्रावती शहर शिवसेनेच्या वतीने नंदू पढाल शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.महेश मानकर हाच खरा भद्रावती भूषण आहे. त्यामुळे या कलाकाराला भद्रावती भूषण देण्यात यावे अशी मागणी शिवसेना भद्रावती कडून करण्यात येत आहे. तसेच अशा कलाकाराच्या पाठीशी शिवसेना सदैव उभी आहे आणि राहील. अशी ग्वाही नंदु पढाल यांनी दिली. याप्रसंगी घनश्याम आस्वले युवा सेना तालुका समन्वयक, बाळाभाऊ शिरसागर उपतालुका प्रमुख, गौरव नागपुरे युवासेना समन्वयक, येशू आरगी, सतीश आत्राम तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.

