अनिस सुरैय्या तालुका प्रतिनिधी महागांव
महागाव:समाज कल्याण विभागामार्फत संस्थेच्या वतीने चालविण्यात येणारे मागासवर्गीय वस्तीगृह आपल्या हेकेखोर पणामुळे बंद ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या संस्थाचालकांवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा ईशारा गावकऱ्यांनी दिला आहे.स्वातंत्र्य पुर्व काळात शिक्षणाचे महत्व ओळखुन शिक्षण महर्षी स्व.अण्णासाहेब पांडे उर्फ काकाजी यांनी हिवरा शिक्षण संस्थेची स्थापना करून त्याद्वारे लोक सहभागातून ग्रामीण भागातील गरजु विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वस्तीगृह सुरू केले या वस्तीगृहात राहून शिक्षण घेतलेले विद्यार्थी मोठ मोठ्या पदापर्यंत मजल मारून देशसेवेत सहभागी झाले. परंतु कालांतराने या वस्ती गृहाला अवकळा आल्याचे दिसत असुन या ठिकाणी कार्यरत असलेल्या संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराचा फटका बसुन मागील कोरोना काळापासून हे वस्ती गृह बंद पडले असुन ते सुरू आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नसल्याने विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत.सदर वस्तीगृह सुरू करण्यासाठी दर वर्षी मे महिन्यामध्ये जाहिरात व ठराव देण्यासाठी अधीक्षकांनी संस्थेच्या व्यवस्थापक तथा वस्तीगृह सचिव यांच्या विनंती केली परंतु व्यवस्थापकाने नकार देत उलट अधीक्षक व कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत अगोदर तुम्ही दोन लाख रुपये द्या मग वस्ती गृह सुरू करतो असे बजावून सांगितल्याने हे वस्तीगृह बंदच असल्याचे दिसत आहे.वस्तीगृह बंद असल्याने यावस्तिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने याची चौकशी करून वस्तीगृह बंद ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या संस्था चालकांवर कारवाई कारवाई अन्यथा उपोषण करण्याचा ईशारा समाज कल्याण अधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे गावकऱ्यांनी दिला आहे. चौकटवस्तीगृह बंद असल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला.हिवरा संगम येथील मागासवर्गीय वस्तीगृह सुरू करण्यासाठी संबंधित संस्थाचालकांना पत्र दिले होते परंतु वस्तीगृह सुरू करण्यासंदर्भात त्यांची मानसिकता दिसत नसल्याने सदर वस्तीगृह बंद असल्याचा अहवाल समाज कल्याण आयुक्त यांना सादर करण्यात आला असून त्यावर आयुक्तांमार्फत कारवाई केल्या जाणार आहे. पीयुष चव्हाण.समाज कल्याण अधिकारी जि. प.यवतमाळचौकटदोन लाख रुपयांसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ हिवरा शिक्षण संस्थेच्या वतीने समाज कल्याण विभागामार्फत हिवरा सं.अनुदानित मागास वर्गीय वस्तीगृह चालविण्यात येत होते परंतु कोरोना महामारीच्या सावटात सदर वस्तीगृह बंद पडले कालांतराने वस्तीगृह सुरू करण्यासंदर्भात अधिक्षक यांनी संस्थेचे व्यवस्थापक तथा वस्तीगृह सचिव यांना विनंती केली असता त्यांनी वस्तीगृह सुरू करण्यासाठी अधीक्षक व कर्मचाऱ्यांकडे दोन लाख रुपयाची मागणी केली त्यांची पूर्तता न झाल्याने सदर वस्तीगृह सुरू होवु शकले नसल्याने संस्था चालकांच्या दोन लाख रुपयांच्या लालसेपोटी या वस्तीगृहाच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधांतरी झाले असल्याची चर्चा पालकांमध्ये सुरू असून पैशांच्या हव्यासापोटी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडणाऱ्या संस्था चालकांवर कारवाई करण्याची मागणी केल्या जात आहे.