संजय शिंदे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व महायुतीच्या घटक पक्षाच्या वतीने नवनियुक्त कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचा उद्या रविवार (दि.२२) रोजी दुपारी ३.०० वाजता इंदापूर शहरातील वाघ पॅलेस या ठिकाणी नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे व शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी दिली आहे.