सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
बिलोली तालुक्यातील कार्ला फाटा येथे दि.२० डिसेंबर रोजी रात्रीला २ वाजण्याच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या महिंद्रा वाहनात गोवंश जनावरांची चोरी करून नेत असल्याची गोपीनिय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सहा जनावारासह चार नंबर प्लेट असलेली अवैध वाहन पकडून ताब्यात घेतली. बालाजी गंगाधर मिरदोडे यांच्या फिर्यादीनुसार सैफ पटेल,झिया कुरेशी व त्यांच्या इतर साथीदारवर महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अन्वये कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते.त्या अनुषंगाने दि.२० डिसेंबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास बिलोली पोलीस हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना कार्ला फाटा येथे एक काळया रंगाची महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी थांबलेली दिसली असता पोलिस वाहन जवळ जात असतांना सदर गाडी पोलीसांना पाहुण बिलोली शहराकडे निघुन गेली त्यावेळी बिलोली पोलीसांनी तात्काळ सदर गाडीचा पाठलाग करून सदर गाडी थांबवली असता त्यात सहा गोवंश जातीची जनावरे त्याची किंमत १ लाख १२ हजार असल्याची मिळून आली सदर जनावरे व वाहन असे एकुण किंमती ४ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर तस्करा विरूद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्या अन्वये गु.र.क्र. ३४६/२०२४ कलम ३०३(२),३ (५) भा.न्या.सं-२०२३ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिकारी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड (IPS), खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक भोकर, सुरज गुरव अपर पोलीस अधिक्षक नांदेड,रफिक शेख उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली यांनी हा गुन्हा उघडकिस आणला आहे. बिलोली ठाण्याचे सपोनि अतुल भोसले, पोहेकॉ/ मारोती मुददेमवार, सुनिल दस्तके, पोकों/ घोंगडे यांच्या कामगिरी बद्दल वरिष्ठाकडून अभिनंदन केले जात आहे.चौकटगेल्या अनेक दिवसापासून बिलोली तालुक्यात ग्रामीण व शहरी भागातून जनावरांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत पण याबाबत अजूनही छडा लागलेला दिसत नाही. विशेषतः ही जनावरांची तस्करी महाराष्ट्र व तेलंगणाच्या विविध मार्गाने होत आहे अनेकदा वाहाना द्वारे गोवंश जनावरांना नेत असताना विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत.