अनिस सुरैय्या तालुका प्रतिनिधि महागांव
महागांव: कागदपत्रांची पूर्तता करूनही सहा ते सात महिने ग्राहकाला लाभ दिला नाही. पंतप्रधान उज्ज्वला योजनेकरिता एजन्सी कर्मचाऱ्याने दोन हजार रुपयाची मागणी केली. महागाव तहसील कार्यालयाचे निरीक्षण अधिकारी मोहन कोल्हे यांनी केलेल्या चौकशीत गंभीर बाबी समोर आल्या. गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.गुंज येथील क्रांतिसूर्य गॅस एजन्सीविरुद्ध अहवाल तयार करून कार्यवाहीसाठी तहसीलदार मार्फत वरिष्ठाकडे पाठविण्यात आला आहे. वंदना चव्हाण रा. सवना यांनी क्रांतिसूर्य एजन्सी गुंज येथे रीतसर कागदपत्राची पूर्तता करून गॅस कनेक्शन पुरवठा करण्याची मागणी केली होती. संबंधित एजन्सीकडून अनेक दिवस त्यांना कनेक्शन देण्यात आले नाही. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेसाठी दोन हजार रुपयाची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी निरीक्षण अधिकारी मोहन कोल्हे यांनी दोन दिवसांपूर्वीच केलेली आहे.१०७ परवानाधारक लाभार्थ्यापैकी ७२ लाभार्थ्याकडून जास्तीचे पैसे आकारण्यात आल्याचे लाभार्थ्यांच्या बयानातून समोर आले. यामुळे निरीक्षण अधिकाऱ्यांनी आगाऊची रक्कम ६१ हजार रुपये वसूल करून शासन जमा करण्याचे तसेच लाभार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी परवाना निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. गॅस गोदामाची तपासणी केली असता, गोदामामध्ये अग्निशमन यंत्र आढळले नाहीत.चौकट संबंधित गॅस एजेन्सीच्या विरुद्ध अलेल्या यापुर्वीच्या तकरारीवरही कार्यवाही नाही.या पुर्वी दी.०३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतिसुर्य गॅस एजेन्सी उज्ज्वला योजना लाभार्थींकडुन आगाऊ रक्कम घेत असल्याची तकरार अनिस सुरैय्या यांनी महागांव तहसील कार्यालय येथे केली होती.परंतु पुरवठा अधिकारी आरसुळे यांनी संबंधित गॅस एजेन्सीकडुन अर्थीक देवान-घेवान करुन प्रकरण दाबले होते.जर वेळीच पुरवठा निरीक्षक आरसुळे यांनी योग्य कार्यवाही केली असती तर पुन्हा अस प्रकार घडला नसता.