कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ खडकवासला पाणीप्रश्नासाठी वरदान
संतोष भरणे ग्रामीण प्रतिनीधी इंदापूर
कळस -विधानसभेच्या निवडणुकीत इंदापूरच्या जनतेने खडकवासला पाणीप्रश्न, बावीस गावांचा पाणीप्रश्न यासाठी शेटफळ गढे उजनी उपसा सिंचन योजनेच्या रूपाने मामांनी 2021रोजी केलेला प्रामाणिक प्रयत्न अन या पाच टी एम सी च्या योजनेसाठी घेतलेली शासकीय मान्यता भलेही काही गैरसमजातून या योजनेला विरोध झाला ही या योजनेची मान्यता रद्द करण्यात आली पण हिच योजना भविष्यात येणाऱ्या काळात मामांच्या माध्यमातून मार्गी लागेल याच अपेक्षेने मामांना मतदान केले अन निवडून दिले अन तिसऱ्यांदा विधानसभेत पाठविले,सरकार महायुतीचे आले अन इंदापूरसाठी मा.दत्तामामा भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. तालुक्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने तालुक्यात जल्लोष तर झालाच पण याच मंत्रीपदाने तालुक्यातील पाणीप्रश्न कायमचा मिटणार अन या पाच वर्षात हा विषय मामांच्या माध्यमातून नक्कीच मार्गी लागणार अशा भावना जनतेतुन सुर धरत आहेत. इंदापूरकरांच्या पाच टी एम सी उजनीच्या पाण्याविषयीं अपेक्षा नक्कीच द्विगुणित झाल्या आहेत. चौकट -एकीकडे कॅबिनेट मंत्रीपद जरी इंदापूरसाठी मिळाले असले तरी “इंदापूर पाणीप्रश्नाचे “खुप मोठे ओझंही या मंत्रीपदावर आहे अन हा पाणीप्रश्न मार्गी लावणं हे एक च्यालेंज या मंत्रीपदासाठी आहे.भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी हा पाणीप्रश्न सोडविणे, मार्गी लावणे, अन इंदापूरकरांच्या अपेक्षांची पूर्तता करणं ही एक अग्नीपरीक्षाच या कॅबिनेट मंत्री पदासाठी आहे असं म्हटलं तरी चालेल. श्री.विजय गावडे खडकवासला प्रकल्पग्रस्त शेतकरी कळस.








