संजय शिंदे
तालुका प्रतिनिधी
दिनांक १७/०६/२०२६ रोजी शिवाजी नामदेव नांदे वय ४५ राहणार- वीरवाडी नं.२, मदनवाडी ता. इंदापूर जि. पुणे व त्यांचे चुलत भाऊ तानाजी तात्याबा नांदे रा. राजेवाडी ता. दौंड जि. पुणे हे त्यांचे शेतातील कांदा दोन नवीन महिंद्रा बोलोरो पिकअप जीपमध्ये भरून तो सोलापूर मार्केट येथे विक्रीसाठी घेवून जात असतांना दिनांक १८/०६/२०२६ रोजी रात्री ००.०५ वा. चे सुमारास टेंभुर्णी पोलीस ठाणेच्या हददीत सापटणे टें गावचे शिवारात राजस्थान ढाब्याचे पुढे तीन किमी अंतरावर रावर पुणे सोलापूर रोडवर त्यांचे पाठीमागून एका मोटारसायकलवरून तीन अनोळखी इसम वय अंदाजे २५ ते ३० वर्षे यांनी येवून पिकअप चे ड्रायव्हरला तुला गाडी नीट चालविता येत नाही असे म्हणून त्यास थांबवून त्याला व कांदा मालाचे शेतकरी शिवाजी नांदे यांना मारहाण करून कांदयाची ४३ पोती व नवीन पासिंग न झालेली झालेली महिंद्रा कंपनीची बोलोरो पिकअप जीप, एक मोबाईल फोन व कागदपत्रांची पिशवी असा एकुण १०,३४,३५०/- रूपयेचा ऐवज जबरी चोरी करून चोरून नेलेने त्याबाबत शिवाजी नामदेव नांदे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाणेत फिर्याद दिलेवरून टेंभुर्णी पोलीस ठाणेत गु.र. नं -४१६/२०२६ भा.न्या. संहिता क. ३०९ (४), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.गुन्हा दाखल झालेनंतर मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकणी सोो, सोलापूर ग्रामीण मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. विजय कबाडे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा उपविभाग श्रीमती अंजना कृष्णा मॅडम, टेंभुर्णी पोलीस ठाणेचे मा. पोलीस निरिक्षक श्री. महेश ढवाण सोो यांनी घटनास्थळास भेट देवून सदर गुन्हयाचे तपास अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सपोनि. संदेश बावकर त्यांचे पथकातील पोहेकॉ/९५ विलास नलवडे, पोहेकॉ/१७४६ संदिप गिरमकर, पोकॉ/६८२ मोहन तळेकर, पोकॉ/१३३४ सुरज मुलाणी यांना तपासाबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सपोनि संदेश बावकर व त्यांचे पथकाने आरोपींचा व चोरीस गेले मालाचा शोध घेत असतांना उजनी धरणाजवळ चोरटयांनी चिल्लारी झुडूपात कांदयाची पोती फेकून दिलेली पोलीसांना मिळून आली तसेच चोरलेल्या नवीन पिकप जिपचा फासटॅग चोरटयांनी काढून टाकून ती जीप घेवून गेले होते. अशा अशा परिस्थितीमध्ये तपासाचा कोणताही धागादोरा हाताशी लागत नसतांना तपास पथकाचे सपोनि बावकर व त्यांचे टिमने अहोरात्र भिमानगर, रांजणी, हिंगणगांव, तरटगांव कांदलगाव इत्यादी ठिकाणी फिरून चोरांच्या टोळींची गोपनीयपणे तांत्रिक माहिती काढून त्यांचे बुध्दीकौशल्याने तांत्रिक विश्लेषण करून तपास केला असता आरोपी नामे १) प्रणित उर्फ नन्या संजय गायकवाड वय २१ वर्षे राहणार आंबेडकरनगर रांजणी ता. माढा जि. सोलापूर २) शाहरूख उर्फ श-या राजू शेख वय २१ वर्षे राहणार- छत्रपती शिवाजी विदयालयाचे मागे भिमानगर ता. माढा जि. सोलापूर ३) अथर्व उर्फ चिकास सोमनाथ खानेवाले वय १९ वर्षे राहणार- आजोती ता. इंदापूर जि. पुणे सध्या राहणार -राजेवलीनगर इंदापूर ता. इंदापूर जि.पुणे ४) संदेश उर्फ नवा सुभाष भोसले वय १९वर्षे राहणार भोसलेवस्ती, बाभुळगांव ता. इंदापूर जि. पुणे यांना शिताफीने पकडून त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरलेले नवीन महिंद्रा बोलेरो कंपनीची पिकप जीप व कांदा असा एकुण १०,३२, २५०/- रूपयेचा मुददेमाल त्यांचेकडून जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा उर्वरित तपास चालू असून आरोपींनी अशाच प्रकारे आणखीन कोठे कोठे गुन्हे केले आहेत याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाणेचे डि बी पथकाचे प्रमुख सपोनि. संदेश बावकर हे तपास करीत आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकणी सोो सोलापूर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. विजय कबाडे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा उपविभाग श्रीमती अंजना कृष्णा मॅडम टेंभुर्णी पोलीस ठाणेचे मा. पोलीस निरिक्षक महेश ढवाण सो यांचे मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाणेचे डिबी पथकाचे प्रमुख सपोनि. संदेश बावकर व त्यांचे पथकातील पोहेकॉ/९५ विलास नलवडे, पोहेका /१७४६ संदिप गिरमकर, पोकॉ/६८२ मोहन तळेकर, पोकॉ/१३३४ सुरज मुलाणी, चालक पोकों/हनुमंत देवकर, चालक पोकॉ/समाधान धोत्रे व सोलापूर सायबर विभागाचे पोकॉ/ व्यंकटेश मोरे यांनी पार पाडलेली आहे.





