भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड
माहूर- परभणी येथील घटनेत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा बहुजन आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ न्यायालयीन कस्टडीत शहीद झाला आहे. सदरचा मृत्यू संशयास्पद असल्याने सदर घटनेच्या आंबेडकरी व संविधानवादी जनतेच्या वतीने दि.१७ रोजी माहूर बंदची हाक दिली होती.या बंदला माहूर येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या वेळी शहरातील डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौक येथे संविधानवादी व लोकशाहीवादी नागरिक जमा झाले यावेळी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यास श्रद्धांजली अर्पणकरण्यातआली.वआंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावे. अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी व अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी असे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. यावेळी तहसीलदार किशोर यादव यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. संविधानप्रेमी व लोकशाही वादी नागरिकांची उपस्थिती होती, दरम्यान कोणतेही अनुचीत प्रक्रार घडू नयेत म्हणून पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, स.पो.नि. रमेश जाधवर, पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राम्हण पो.हे.कॉ. गंगाधर खामनकर, पो.कॉ.गजानन जाधव, व सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवुन संविधान प्रेमींना सहकार्य केले.