विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर:माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील डिकसळगावाला दिवाळीची भेट दिली आहे. इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश उत्तमराव काळे यांची कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी निवड करून हर्षवर्धन पाटील यांनी डिकसळ गावासाठी दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. सतीश काळे यांचे वडील कै. उत्तमराव काळे हे माजी खासदार कै. शंकरराव पाटील व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेक वेळा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी मागितली होती. त्यांच्या निधनानंतर सतीश काळे यांनी सुद्धा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यात उमेदवारी मागितली होती परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती परंतु त्यांनी आपली निष्ठा कायम ठेवत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सातत्याने समर्थन दिले होते. सतीश काळे यांच्या कर्मयोगी शंकराव सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक निवडीनंतर निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय मिळाला अशा प्रकारची भावना परिसरात व्यक्त होत आहे.


