दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी, जव्हार
जव्हार : जव्हार आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व वीर बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती निमित्त, जव्हार आदिवासी युवा संघाकडून दिवाळी निमित्त, शनिवारी 11 नोव्हेंबर रोजी, “वाघबारस” महोत्सवाचे आयोजन, जव्हार मधील राजीव गांधी क्रीडा संकुलनात करण्यात आले होते. वाघबारस कला, क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जव्हार संस्थांनाचे राजे श्रीमंत महेंद्रसिंघ मुकणे यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या महोउत्वात कला, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.दिवाळी सणापूर्वी येणाऱ्या ” वाघबारस” रोजी शनिवारी आदिवासी युवा संघाने ह्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले होते. आयोजित केली क्रीडास स्पर्धेत कबड्डी, खो-खो महीला पुरुष असे सांघिक खेळ होते. तर त्यानंतर गोळा फेक, गलोल नेमबाजी, असा खेळांचे आयोजन केले होते. क्रीडास स्पर्धेसाठी जव्हार मोखाडा, विक्रमगड, वाडा, पालघर, आणि नाशिक जिल्ह्यातील काही कब्बडी, खो-खो खेळाचे संघ आले होते. ह्या वाघबारस क्रीडा महोउत्वात जवळपास २ हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेवुन खेळाचा आनंद घेतला. ह्या खेळाडू संघाना प्रथम, दृतीय, तृतीय, असा येणाऱ्या संघाना चषक, रोख रक्कम, देवुन गौरविण्यात आले. वाघबारस महोत्सवात विशेष आकर्षण ठरले, ते आदिवासींची पारंपरिक सामूहिक नृत्य स्पर्धा, त्यात ढोल नाच, तारपा वादक, संबळवादक, वाघ नृत्य, नंदी बैल, शंकर पार्वती,त्यातच आदिवासींचा दैवत हिरवा देव असे आदिवासींचे सर्वच नृत्य, कला मान्यवर आणि प्रेक्षकांना बघायला मिळाले. ह्या महोत्सवात सहभाग घेणऱ्यांना पारितोषीक देवुन गौरविण्यात आले.
“वाघ बारस महोत्सवाला पालघरचे खासदार राजेंद्र गावित आणि पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी विशेष उपस्थिती नोदवून, आदिवासी खेळाडूंना मार्गदशन केले. तसेच काही खेळाडूंना पारितोषिक देवुन कौतुक केले. “वाघ बारस” महोत्सव, कला, क्रीडास स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या जव्हार मधील आदिवासी युवा साघांचे कौतुक केले. ह्या कला, क्रीडा महत्सवासाठी जव्हार संस्थांनाचे राजे श्रीमंत महेंद्रसिंघ मुकणे, यांची उपस्थित होती. तसेच जि.प. सदस्य सुरेखा थेतले, सभापती विजयाताई लहारे, पोलीस निरिक्षक संजयकुमार ब्राम्हणे ,युवा आदिवासी संघाचे सर्व पदाधिकारी, तसेच स्पर्धेत सहभागी असणाऱ्या खेळाडूंचा मोठा सहभाग बघायला मिळाला.”