संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर-आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर येथील साठेनगर या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.हर्षवर्धन पाटील म्हणाले की,क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची आज 229 वी जयंती आहे.त्यांनी क्रांतीची ज्योत इंग्रजांच्या विरोधात उभी केली,संघर्ष करून त्यांची राजवट उध्वस्त करण्यासाठी व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता जे महान युगपुरुष निर्माण झाले त्यामध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव आग्रहाने घेतले जाते.इंग्रजा विरोधात क्रांती घडवून समाज उभा केला आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.135 कोटी देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे शिल्पकार म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे. सर्व तरुण वर्ग त्यांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे.यावेळी जयंती उत्सव कमिटीचे ललेंद्र शिंदे सचिन आरडे तसेच ॲड.राहुल मखरे शकील सय्यद कैलास कदम गोरख शिंदे तानाजी धोत्रे सागर गानबोटे योगेश कांबळे साजन ढावरे उपस्थित होते.


