भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कुणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मार्गक्रमण करणे गरजेचे आहे.आपण कोणत्या शाखेत प्रवेश घेतला किंवा कोणत्या परिस्थितीत शिकलो यावर आपले करियर ठरत नसते,त्यासाठी गरज असते मार्गदर्शनाची आणि प्रामाणिक प्रयत्नांची,यासाठी कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह कटिबद्ध आहे असे प्रतिपादन माजी विद्यार्थी मेळाव्यात जि.प सदस्या हर्षदा काकडे यांनी केले.आपल्या भाषणात त्यांनी आगामी काळात शैक्षणिक गरज म्हणून वाणिज्य विद्या शाखा त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र याबाबत मार्गदर्शन केले.श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे माजी विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.याप्रसंगी माजी विद्यार्थी मुख्याधिकारी प्रमोद लांडे,वैभव गाडगे,माधुरी घोरपडे,अमोल लांडे, राहूल फसले,प्रमोद निकाळजे, प्रतिक्षा पाटेकर,आदिनाथ गर्जे यांचेसह महादेव पाटेकर,बापूसाहेब पाटेकर त्याचबरोबर पंचायत समितीचे गट विकास अधिकरी श्री.सुरेश पाटेकर साहेब यांनी आपल्या मनोगतात शाळेतील त्यांचा प्रवास आणि केलेले प्रामाणिक प्रयत्न याबाबत मार्गदर्शन केले.विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी आपल्या मनोगतात शाळेचे विद्यार्थी हे शाळेचे आधारस्तंभ असतात. विद्यालयाच्या इतिहास लेखन कामी माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे त्याच बरोबर विद्यालयास येणाऱ्या अडचणी साठी यापुढेही सहकार्य ठेवावं असे मत मांडले.कार्यक्रमासाठी जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे,बापूसाहेब पाटेकर,गटविकास अधिकारी सुरेशजी पाटेकर,माजी प्राचार्य विक्रमराव उकिर्डे,देविदास गिर्हे,महादेव पाटेकर,रविंद्र लांडे साहेब,बाबासाहेब कराड,सरपंच अनंता उकिर्डे,संभाजी लांडे,रविंद्र राशिनकर,सूर्यकांत गाडगे,डॉ देविदास देशमुख,बाळासाहेब कराड, बद्रीनाथ बुधवंत,भिवसेन केदार, पांडुरंग गरड,आसाराम शेळके म्हातारदेव आव्हाड,सागर देशमुख,पत्रकार दिपक खोसे, पत्रकार सुभाष बुधवंत,पत्रकार भारत भालेराव,प्राचार्य संजय चेमटे, पर्यवेक्षक सुनील जायभाये यांचेसह शिक्षक-शिक्षेकतर कर्मचारी आणि ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे माजी विद्यार्थी व उद्योग संचालक सागर लांडे साहेब यांनी तर ग्रा.प.सदस्य देविदास गिर्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले.