राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आलापल्ली – विदर्भ रिझन कराटे-डो असोसिएशन या युवक सेवा सचंलनालय पुणे व्दारा शासन मान्य संस्थेअतर्गत दि गडचिरोल्ली डिस्ट्रीक्ट कराटे-डो असोसीएशन अहेरी जिल्हा गडचिरोल्ली व्दारा रवि, मार्शल आर्ट कराटे अँन्ड स्पोर्टस् अँकॅडमी अंतर्गत आलापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालय फाॅरेस्ट काॅलनी येथील भव्य पटागंणावर नविन कराटे प्रशिक्षण वर्गाचे ऊदघाटन करण्यात आले.
या सोबतच दिनांक 14 सप्टेबंर ते 19 सप्टेबंर 2021 दरम्यान काठमांडु नेपाळ येथे होणार्या 4 थी आमंत्रीत ईडों-नेपाल आतंरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरीता कराटे तथा अँथेलेटीक या प्रकाराकरीता निवड चाचणी घेण्यात आली. त्यात कु.शर्वरी नागरे, कु.रिद्धी देशपांडे, कु.प्राची येनगंनटीवार, कु.इशिता मुप्पावर, कु.स्मिता अग्गुवर, कु.अक्षरा तालाकवार, मास्टर कौशिक गन्धम, शंतनू नागरे,स्पदंन भुरसे, कार्तिक येमुलवार, पृथ्वी वरठे, उज्ज्वल गौतम, नील बोमकंटीवार, पार्थ बंडावार आदी कराटे पट्टु तथा अँथलेटीक रनिगं प्रकारात 100 मि, 400 मिटर स्पर्धेकरीता लच्चा दुग्गा वेलादी या खेडाळुची निवड आलापल्ली कराटे डोजोत झालेल्या निवड प्रक्रियेतून स्वीकृत अभिलाश कुमार अध्यक्ष युथ अँन्ड स्पोर्ट्स असोसिएशन इंडिया भारतीय चम्मु प्रमुख जम्मु आणि कश्मीर तथा मुख्य प्रशिक्षक तथा परीक्षक आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट राष्ट्रीय पदक विजेते प्रा.सेन्साई रवि भांदककार यांनी केली असून सदर भारतीय कराटे व अँथलेटीक चम्मू दिनांक 12 सप्टेबंर 2021 ला गोरखपुर ( ऊत्तर प्रदेश ) करिता रवाना होईल व तिथुन सम्पुर्ण भारतीय चम्मु 14 सप्टेबंर 21 ला नेपाल पोखरा काटमाडुं येथे 14 ते 19 सप्टे.21 दरम्यान होणार्या आतंरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धे करीता रवाना होईल असे सेन्साई रवि भांदककार यांनी सांगितले. या निवड चाचणी व कराटे वर्ग ऊदघाटन कार्यक्रमाकरीता आलापल्लीचे प्रथम नागरीक तथा सरपंच व ऊत्तम कराटेपट्टु श्री शकंर मेश्राम हे ऊपस्थीत राहुन त्यानी सर्व खेळाडुनां ऊत्तम मार्गदर्शन केले. ऊत्तम आरोग्य व स्पर्धा ऊत्तम भरारी करीता मार्शल आर्ट कराटे चे प्रशिक्षण अत्यावश्यक आहे असे प्रतीपादन केले. तसेच विदर्भाचे मुख्य प्रशिक्षक तथा परीक्षक व सचिव तथा राष्ट्रीय मुष्टीयोध्दा सेन्साई अरविंद पाटील सर नागपूर तथा मुक्तेश्वर गावडे अध्यक्ष जी.डी.के.ए , मुख्याध्यापक तथा प्राचार्य मानं श्री लोणबले राणी दुर्गावती विद्यालय, बि.एस.एफ जवान रमेश मेश्राम यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा प्रदान केल्या. या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता राजु नागरे, सुर्यकांत मोरे, प्रशांत जोशी, श्रीनिवास पेद्दी, रघुनाथ तलांडे, रुषी सुखदेवे, अतुल सिगंरु व सर्व अहेरी डोजोचे कराटे पट्टु आणि पालक वर्ग आदीनी परीश्रम व सहकार्य केले.