गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- राज्य मार्ग महामंडळाच्या वेतनवाढ आणि इतर भत्ते यासह राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या संबंधाने ७ नोव्हेंबर पासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. आर्थिक विवंचनेतून कर्मचारी आत्महत्या करीत आहेत. संपामुळे प्रतिदिन येथील एसटीची वाहतूक बंद असल्याने चार लाख रुपयांचे नुकसान होत आहे शासनाचे निर्दय अडेल धोरणाच्या निषेधार्थ तेल्हारा आगारातील २० कर्मचाऱ्यांनी ९ नोव्हेंबर रोजी मुंडन करून आंदोलन केले.महाराष्ट्र तेल्हारा आगार अंतर्गत एसटीचे संपकरी कर्मचारी आपला आवाज शासनापर्यंत पोहोचण्यासाठी गुरुवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी तेल्हारा तहसीलदारांमार्फत लढा एसटी विलीणीकराचा एस.टी. कर्मचारी बेमुदत मुख्यमंत्र्यांच्या नावे एक विस्तृत निवेदन मोर्चा काढून सादर करणार आहेत.सदर मोर्च्यात एसटीचे १०० कर्मचारी सहभागी होणार असल्याने व मोर्चा सकाळी ११ वाजता आरंभ होणार असल्याचे तेलारा पोलिसांना देण्यात आलेल्या परवानगीसाठी देण्यात आलेल्या निवेदनात अर्जदार वाहक संदीप यशवंत वानखडे यांनी नमूद केले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींचे पालन सह निघणारा एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा तेल्हारा येथील आगार जवळून प्रारंभ होणारआहे. संत तुकाराम महाराज चौक, अशोक वाटिका चौक मार्गे तेल्हारा तहसील कार्यालयात पोहोचेल असे निवेदनात नमूद केले आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संबंधाने अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तद्वतच प्रवाशांची संपामुळे होणारी कुचंबणा, खासगी वाहतूकदारांकडून होणारी आर्थिक लूट यामुळे प्रवासी वर्गातून ही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.