अकोला,दि.10 – भारत निवडणुक आयोगाने अकोला, वाशिम व बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला असून जिल्ह्यात तात्काळ प्रभावाने निवडणूक आदर्श आचार संहीता लागु झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी मतदान तर मंगळवार दि. 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.
अकोला-वाशिम-बुलडाणा या जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकार मतदार संघाच्या निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रम याप्रमाणे-
· मंगळवार दि. 16 नोव्हेंबर रोजी विधानरिषद सदस्याची निवडणुकीची अधिसुचना जाहीर करणे.
· मंगळवार दि. 23 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक.
· बुधवार दि. 24 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी.
· शुक्रवार दि. 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक.
· शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान.
· मंगळवार दि. 14 डिसेंबर रोजी मतमोजणी.
· गुरुवार दि. 16 डिसेंबरपर्यंत निवडणुक प्रकीया पूर्ण करण्यात येईल.