अतिश वटाणे तालुका प्रतिनीधी उमरखेड
उमरखेड येथील राजे संभाजी महाराज उद्यानाची संध्याकाळची वेळ वाढविण्यात यावी यासाठी पुरोगामी युवा ब्रिगेड ने नगरपालिकेला निवेदन दिले होते. याची दखल घेत उद्यान बंद करण्याची वेळ ही संध्याकाळी ७:३० ऐवजी अत्ता ती ८ पर्यंत करण्यात आली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने लहान मुल आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी संध्याकाळीच बाहेर पडत असतात. परंतु दिवस ७ वाजता मावळत असल्यामुळे व उतरत्या उन्हामुळे पालक आपल्या मुलांना दिवस मावळल्यानंतरच घरा बाहेर पाठवीत आहेत. परंतु उद्यानात पोहोचे पर्यंत उद्यान बंद केले जात आहे या मुळे उमरखेड वासियांची हिरमोड होत होती. ही बाब पुरोगामी च्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी नगर पालिकेच्या उपमुख्याधिकारी नितीन चव्हाण यांना कळवले. त्यांनी ताबडतोब उद्यानाची संध्याकाळ ची वेळ वाढवुन ८ पर्यंत केल्यामुळे उमरखेड वासियांना अत्ता अर्धा तास अधिक उद्यानाचा आनंद लुटता येणार आहे. यावेळी पुरोगामी युवा ब्रिगेड चे माजी जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे पाटिल, तालुका सचिव आतिश वटाणे, प्रवक्ता शाहरूख पठाण, शहर कार्याध्यक्ष नागराज दिवेकर आदि उपस्थित होते.