प्रकाश कांबरे तालुका प्रतिनिधी हातकणंगले
हातकणंगले : शिरोली यात्रा व ऊरुसा निमीत्त विना परवाना घोडा -गाडी शर्यत आयोजित केले प्रकरणी शिरोली सरपंच पद्यजा करपे उपसरपंच अविनाश कोळी यांच्या सह सर्व ग्रा.पं.सदस्य व घोडा -गाडी चालक सह २३ जणांवर गुन्हा दाखल झालेचे शिरोली सपोनि पंकज गिरी यांनी सांगीतले.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ सह ( ३ ),प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११(१)(a) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे तर या बाबतची तक्रार निलेश मच्छिंद्र कांबळे पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिली आहे.यातील आरोपीची नावे सरपंच पद्मजा कृष्णात करपे, उपसरपंच अविनाश अनिल कोळी, बाजीराव शामराव पाटील,सुजाता बाळासो पाटील, महादेव रघुनाथ सुतार,विजय बंडा जाधव,श्रीकांत बापू कांबळे, मनिषा संपत संकपाळ,कमल प्रकाश कौंदाडे महंमद युसुफ महात,कोमल सचिन समुद्रे, कु.वसिफा हिदायतनुल्ला पटेल,कु.हर्षदा दिपक यादव,आरिफ महंमद सर्जेखान अनिता विठ्ठल शिंदे,नजिया मोहिद्दीन देसाई,धनश्री योगेश खबरे,शक्ती दिलीप यादव सर्व ग्रा.पं. सदस्य तसेच घोडा -गाडी चालक शाहरुख मौला जमादार, फिरोज मौला जमादार,अरमान राजु सर्जेखान,समीर नसीर सनदे,रियाज राजू नगारजी सर्व मिळून २३ जण असुन सर्वजण शिरोली पुलाची येथील आहेत.सदरचा गुन्हा दि.१३/५/२०२४ रोजी सकाळी ०८.०० नंतर शिरोली एमआयडीसी मधील शिवसुत्र तरुण मंडळ ते विटभट्टी माळभाग परीसरात विनापरवाना घोडा -गाडी शर्यती वेळी घडला असुन गुन्ह्यातील जखमी मोटरसायकल चालक संजय तात्यासी संकपाळ रा.सोडगे गल्ली, शिरोली पुलाची ता. हातकणंगले तसेच आरोपी शाहरुख मौला जमादार याचे मालकीचे/ताब्यातील दोन घोडे वअरमान राजु सर्वेखान यांचे मालकीचे/ताब्यातील दोन घोडे.शिरोली पुलाची यात्रा व ऊरुस अनुषंगाने बैलगाडी शर्यतीची परवानगी उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी विभाग इचलकरंजी यांचेकडून घेवुन दि.१३/०५/२०२४ रोजी सकाळी ८.०० नंतर बैलगाडी शर्यती संपले- नंतर विनापरवानगी घोडागाडी शर्यतीचे आयोजन करून घोडागाडी शर्यंत स्पर्धेमध्ये आरोपी शाहरुख मौला जमादार फिरोज मौला जमादार, अरमान राजु सर्वेखान, समीर नसीर सनदे,रियाज राजू नगारजी या घोडागाडी स्पर्धकांनी भाग घेचुन त्यांचे ताब्यातील घोड्यांना निर्दयतेने वागुणक देवुन मारहाण केली असुन, त्यामध्ये वरील ५ आरोपी यांचे मालकीचे/ताब्यातील चार घोडे पडुन जखमी होवुन, घोडागाडीवरील दोन चालक व पाठीमागुन येणारा मोटर सायकलस्वार संजय तात्यासो संकपाळ रा.सोडगे गल्ली, शिरोली पुलाची हा मोटरसायकलसह पडुन किरकोळ जखमी झालेबाबत निलेश कांबळे पोलिस कॉन्सटेबल तक्रार दाखल केली असुन सदरचा गुन्हा प्रथमवर्ग न्याय – दंडाधिकारी कोर्ट पेठवडगाव ता. हातकणंगले यांचेकडे पाठविला आहे.सदर गुन्ह्याचा तपास सपोनि पंकज गिरी यांचे मार्गदर्शना- खाली सहाय्यक फौजदार एस बी कोळी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हे करीत आहेत.











