स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शहरातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी 24 तास सेवा देणारा आरोग्य दूत म्हणून भावीकजी भगत यांचे नाव पंचक्रोशीत घेतले जात आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ओवी प्रमाणे 100% खरे उतरणारे एक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक हे गोरगरीब जनतेच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. निस्वार्थपणे सेवा कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही वेळेला आलेला फोनवर सहज धावून जाणारा निष्ठावंत समाजसेवक उमरखेड वासियांना लाभला आहे. असे जनतेतून कौतुक होत आहे मागील काही वर्षापासून यवतमाळ जिल्ह्याचे शासकीय रुग्णालय हे त्यांचे जणू काही त्यांचे घरच झालेले आहे. अशी निस्वार्थ सेवा देणारी माणसं आजच्या युगात पहावयास फार कमी मिळतात उमरखेड तालुक्यातील आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी भावीकजी भगत हे आरोग्य दूतच ठरले आहे.