अजीज खान
शहर प्रतिनिधी ढाणकी
दोन दिवसापूर्वी निंगनुर येथे अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला व पोलिसांनी तत्काळ व्यक्तीला अटक करून भविष्यात अनेक अघटीत घडणाऱ्या घटनांना लगाम घालण्याचे काम केले. असे असताना जिलेटिन हे सुद्धा स्फोटक तेवढेच हानिकारक आहे जिलेटिन स्फोटकावर शासकीय नियंत्रण असते पण ढाणकी व परिसरात हे घातकी स्फोटकाचा नको तिथे व बेकायदेशीर वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे जिलेटिन स्फोटके बेकायदेशीर विकता येतात?? पण ढाणकी परिसरात बिन बोभाटपणे यंत्रणेला हाताशी धरून अव्वाच्या सव्वा रक्कमेत स्फोटके विकत असल्याचे बोलल्या जात आहे असे असताना अशा बाबीचा वापर नियमितपणे चालू असताना संबंधित विभाग मात्र त्यांच्या हातात काहीही नाही व ते निष्क्रिय आहेत अशा भूमिकेत आहेत?पण धाक व वचक असणाऱ्या दुर्लक्षित धोरणामुळे जनसामान्यांचा एखाद्या वेळी जीव सुद्धा जाऊ शकतो. मोठी दुर्घटना होऊ शकते हे सगळं घडण्याआधी यावर नियंत्रण मिळवण्याची मागणी प्रकर्षाने पुढे येत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाळा असताना जिकडे तिकडे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते हे स्थिती वर्तमान काळात अधिक पणे भेडसावत आहे शेतकरी सुद्धा आपले पिक वाचवण्यासाठी धडपड करतो व पिकाला पाणीपुरवठा करणाऱ्या श्रोताकडे शेतकरी आपसूकच वळतो खोदकाम करून पाण्याच्या मुबलक साठा कसा होईल याकडे शेतकरी लक्ष केंद्रित करतो खोदकाम करायला कोणीही मजूर धजावत नाही मग सरासपणे जिलेटीन कांड्यांचा वापर होतो. जिलेटिन या स्फोटकाचा काळाबाजार करून स्फोटके अधिकच्या दरात विकल्या जात असल्याचे सुद्धा ऐकिवात आहे. ढाणकी आणि परिसरात काही फुटापर्यंत खोदकाम केल्यानंतर कठीण असा पाषाण आहे तो फोडण्यास अत्यंत टनक कडक असतो याच ठिकाणी स्फोटक अशा जिलेटीनचा व्यवसाय बळकटी घेतो विशेष म्हणजे या व्यवसायात इतर प्रांतामधून आलेली मंडळी प्रामुख्याने दिसते ढाणकी व आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नेटवर्क पसरले आहे अवघ्या काही वर्षाचे नवतरुण सुद्धा या कामात गुंतले असल्याचे सांगण्यात येते असे असताना स्फोटके हाताळण्या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नसताना ही स्फोटके जीवावर बितू शकते जिलेटिनच्या ज्या कांड्या असतात त्यात मोठा स्फोट होईल अशी क्षमता व शक्ती असते . एखाद्या वेळेस स्फोटाला लावण्याची वायर नको त्या ठिकाणी लावल्या गेल्यास घटना घडून एखाद्या निष्पाप व्यक्तीचा “बळी” सुद्धा जाऊ शकतो. अशा जीवावर बितणाऱ्या स्फोटकाचा वापर व साठा करण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला??
जिलेटिन वापराबाबत जिल्हाधिकारी कार्यालय यांनी अधिकार दिले आहे का हे ध्यानात घेतली पाहिजे. विस्फोटकाच्या साठवणुकीची व ती वापरात आणण्याची परवानगी हे विस्फोट व इंधन सुरक्षा या संघटनेकडे( पैसो) कडे असल्याचं कळते तेव्हा अनेक जण हे वापर करत असताना त्यांना परवाना घेतला आहे का? याबद्दल प्रश्न उपस्थित होतो पोलीस प्रशासन आणि महत्त्वाचा दुवा असलेली महसूल प्रशासकीय यंत्रणा या विभागाला चिरीमिरी देऊन विनापरवाना व्यवसाय चालतो हे त्रिकालबाह्य धगधगते वास्तव चौकशी झाल्यास उजेडात येऊ शकते.











