मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानातर्फे आयोजित आपल्या जीवनाचे धैर्य हे सुख नसून सत्य असायला हवे, जगाला युद्ध नको बुद्ध पाहिजे,जगात दुःख आहे आणि त्याचे निवारण बुद्ध विचार मार्गाने करता येते ,म्हणून बुद्धाच्या धर्माचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाच्या माध्यमातून सामनेर व अनागारिका असे पाच दिवसीय धम्म शिबिराचे आयोजन लुबिनी बुद्ध विहार,प्राथमिक आरोग्य केंद्र समोर अंजनसिगी येथे बुधवारी 22 मे ते 26 मे 2024 पर्यंत करण्यात आले आहे, बुधवार 22 मे रोजी दुपारी चार वाजतायाचे उद्घाटन होणार असून या पाच दिवशी शिबिराचे धम्म प्रशिक्षक म्हणून पूज्य भंते धम्म तिस्स महाथेरो, औरंगाबाद यांचे हस्ते सामनेर धम्मदीक्षा विधी होणार आहे, तर पूज्य भन्ते राहुल थावीर भिख्य संघ जिल्हाध्यक्ष यवतमाळ, पूज्य भंते धम्म सेंन अमरावती, पूज भंते चंद्रमणी ग्वालियर हे उपस्थित राहणार आहे, यावेळी उद्घाटक पाहुणे म्हणून मा, प्रा, इंदुताई नारनवरे पाली अभ्यासक नागपूर,डॉ, प्रा, प्रवीण जी राऊत आंबेडकर विचारवंत नागपूर, शाऊबाई रामचंद कांबळे विशाखा बहुउद्देशीय समिती अध्यक्ष ,शशिकला नामदेवराव दवाले रमाबाई महिला मंडळ अध्यक्ष, रूपाली गायकवाड सरपंच अंजनसिंगी, तर भारतीय बौद्ध महासभा चे राहुलजी गायकवाड, कैलास भाऊ ठाकरे शिलानंद झांमरे,भगवान चंदनखेडे हे राहणार आहे,या शिबिराचा लाभ घेण्याकरिता आयोजक बंडू आठवले अमरावती जिल्हाध्यक्ष ,नितीन टाले अमरावती जिल्हा संघटक मृदुलता ते हेरोडे अमरावती जिल्हा उपप्रमुख वेळेचा लाभ घेण्याकरिता समस्त जनतेला आयोजकाकडून आव्हान करण्यात आले आहे, शिबिरामध्ये येताना सर्व धम्म रक्षकांना या शिबिराचे नियम व अटीचे आव्हान सुद्धा आयोजकाकडून करण्यात आले आहे.