नवी दिल्ली : देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. 10 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील. सीरम इन्स्टिट्यूकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीचे दर कमी करण्यात आली आहे. सीरमने खासगी रुग्णालयासठी कोव्हिशिल्डचे दर हे तब्बल 375 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कोव्हिशिल्डची लस आता 225 रुपयांना मिळणार आहे. सोबतच भारत बायोटेकच्या सुचित्रा एला यांनी देखील खासगी रुग्णालयासाठी कोवॅक्सीनच्या किंमत कमी केल्या आहेत. कोवॅक्सीनची किंमत आता 1200 वरून 225 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी 16 जानेवारीला देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यावेळी आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील सर्व प्रौढांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे 185.38 कोटी डोस देण्यात आले आहेत. 15 वर्षांवरील जवळपास 96 टक्के लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर 83 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहे.