नवी दिल्ली : 2023 च्या संसदरत्न पुरस्कारासाठी (Sansad Ratna Award 2023) 13 खासदारांचे नामांकन जाहीर झाले आहे. यामध्ये भाजपचे विद्युत बरन महतो (Bidyut Baran Mahato), डॉ. सुकांत मजुमदार यांच्यासह काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा, डॉ. हीना विजय कुमार गावीत यांच्यासह इतर अनेकांची नावे जाहीर झाली आहेत. या 13 खासदारांमध्ये लोकसभेचे 8 आणि राज्यसभेच्या 5 सदस्यांचा समावेश असून, यातील 3 सदस्य हे निवृत्त झाले आहेत.
राजदचे मनोज झा, काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, माकपचे जॉन ब्रिटास, विदयुत बरन महतो (भाजप), डॉ. सुकांत मजुमदार (भाजप), कुलदीप राय शर्मा (काँग्रेस), डॉ.हीना विजय कुमार गावीत, गोपाळ शेट्टी (भाजप), सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) यांच्या तर महाराष्ट्रातील चार खासदारांचा यामध्ये समावेश आहे. हा पुरस्कार देणाऱ्या ‘प्राइम प्वायंट फाउंडेशन’ने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 13 जणांना नामांकन देण्यात आले.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. कृष्णमूर्ती सह अध्यक्ष असलेल्या समितीने नामांकन केलेल्यामध्ये या समितीमध्ये वरिष्ठ खासदार आणि सर्वसाधारण जनतेमधील सदस्यांचा समावेश होता.
नामांकन मिळालेले राज्यातील खासदार
डॉ.अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस)
हिना गावित (राष्ट्रवादी काँग्रेस)
फौजिया खान (भाजप)
गोपाळ शेट्टी (भाजप)