मुंबई : सैराट चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेल्या अभिनेता आकाश ठोसरचा आज 29 वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त आकाशला त्याच्या कुटुंबियांसह मित्र परिवाराकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर तर आकाशला त्याच्या फॅन्सने थेट ‘परश्या’ नावाने शुभेच्छा द्यायला सुरुवात केल्याचे दिसून येते. अशात आकाशाची सैराट पार्टनर आर्ची अर्थात रिंकू राजगुरू देखील मागे नाही. रिंकूने सोशल मीडियावरून आकाश सोबतचे काही फोटो शेअर करत त्याला जन्म दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रिंकूने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये आकाश तिच्याकडे पाहून हसताना दिसत आहे. यावेळी रिकुने पिवळ्या गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली आहे तर आकाशने टी शर्ट आणि कार्गो पंत घातलेली आहे. “हॅप्पी बिर्थडे टू अ स्वीट सोल.. आज उद्या आणि नेहमीच तुला चांगल्या शुभेच्छा” असे कॅप्शन रिंकूने आकाशसाठी दिले आहे. यासोबतच रिंकूने आकाशसोबतचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघेही ब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये दिसत आहेत. यासोबतच या फोटोच्या बॅग्राऊंडला रिंकूने बर्थडे सॉंग देखील लावले आहे.


