तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : पालघर जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यांपासून मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेत्या काँक्रिटीकरणाच्या नियोजन सुन्य कामामुळे प्रवाशी व वाहतूक कोंबडीला सामोरे जावे लागत आहे. मनस्ताप सहन करावा लागतो आहे. तसेच इंधनाचा अपव्यय होतो. काही महिन्यांत राष्ट्रीय महामार्गावर कित्येक निष्पाप लोकांना आपला जिव गमवावा लागला. निकृष्ट दर्जाचे काम असल्याने राष्ट्रीय महामार्गावरून ये – जा करणाऱ्या वाहनांना अव्यवस्थेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. मोठ – मोठे खड्डे त्यामुळे दुर्घटना घडतात. करोड रुपये खर्च करून देखील समाधानकारक रस्त्याचे काम होत नसल्यामुळे लोक नाराज आहेत. जिल्ह्यातील प्रवाशांना यातून दिलासा मिळावा व वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू राहावी याकरिता पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली १२|७|२०२४ जुलै रोजी शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी टोलनाका येथे आंदोलन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित प्रांताधिकारी सुनिल माळी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सुहास चिटणीस यांना ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन दिले व वेळोवेळी आढावा घेणार असल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख शिवसेनेचे कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिला जिल्हा संघटीका वैदेही वाढाण, आदिवासी सेल चे जगदीश धोडी, युवासेना जिल्हाध्यक्ष साईराज पाटील, तालुकाप्रमुख संतोष देशमुख, हेमंत धर्ममेहर , आशिर्वाद रिंजड, युवा सैनिक उपस्थित होते.