मोहन कांबळे ग्रामीण प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव येथील वीर लहुजी चौकात अज्ञात इसमाने एन्ट्रील पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. होता सदर घटनेची माहिती समाज सेवक नागेश बळी व लोकमतचे पत्रकार तुषार मांडे यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले व सदर इसमाला पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती त्या इसमाची विचित्र अवस्था बघून कोणीही मदत केली नाही .पण नागेश बळी व तुषार मांडे हे दोन्ही देव दुत यांनी त्या इसमाला पाहताच आपल्या दुचाकी वर ग्रामीण रुग्णालय मध्ये नेले .व त्याला मालेगाव येथील प्रथम उपचार देत वाशिम येथे ऍडमिट केले सदर इसम भागवत खडसे वय 45 राहणार देवठाणा खांब ता मालेगांव जी वाशिम याचे प्राण वाचले. नागेश बळी व तुषार मांडे यांच्या या कार्याचे नागरिकाकडून कौतुक होतं आहे.