मयूर ढोबळे ग्रामीण प्रतिनिधी,ओतूर
ओतूर: ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित पुष्पावती विद्यालय डिंगोरे या ठिकाणी आज इयत्ता पाचवी ते सातवी दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतीक अकोलकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डिंगोरे गावच्या प्रथम नागरिक सीमा सोनवणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण लोहोटे, पांडुरंग लोहोटे, विठ्ठल उकिरडे ग्रामपंचायत सदस्या निलोफर पठाण उपस्थित होत्या.याप्रसंगी विद्यार्थ्यांची शालेय शिस्त, आरोग्य, आहार, संस्कार, विविध बाह्य परीक्षा, शालेय परीक्षा, पालकांची जबाबदारी, नवीन शैक्षणिक धोरण इत्यादी विषयांवर अनुक्रमे विजय काकडे , वैभव देशमुख, रतिलाल बागुल, किसन भुतांबरे, जगन्नाथ गाढवे यांनी माहिती व मार्गदर्शन केले.पालक मोहिनी डुंबरे, उल्हास आमले, शंकर लोहोटे, जनिषा आमले, सरपंच सीमा सोनवणे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले पुढील काळातही पाल्यांच्या प्रगतीसाठी अपेक्षा व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रेय घोलप, अनुमोदन मंगेश कोंडार ,निवेदन शिल्पा भालेराव यांनी तर उपस्थितांचे आभार विठ्ठल डुंबरे यांनी मानले. अहवाल लेखन दिनेश पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन मंगेश डुंबरे, बैठक व्यवस्था शिवाजी उकिरडे, रेवजी दुधावडे यांनी केली.


