सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
तालुक्यातील ग्रामपंचायत बिलगांव येथील अपंग व्यक्तींना गट विकास अधिकारी पंचायत समिती धडगांव यांच्या हस्ते अपंग निधीचा चेक वितरण करण्यात आले. ग्रामपंचायत बिलगांव येथील मिंत्र्या पावरा, व जोरदार पावरासह कुटुंब ऊसतोड करून उदरनिर्वाह करीत असतात दि १०/१२/२०२३ रोजी लोकमत वृत्तपत्रांत बातमी प्रकाशित झाली त्यामुळे त्यांची दखल अनेक दात्यांनी मदतीचा हात पुढे केलेला असुन तालुक्यातील पंचायत समिती धडगांव व ग्रामपंचायत बिलगांव ला सलग दोन महिन्यांनंतर जाग आलेली दिसुन येते.या दोन दिव्यांग्य बाधवांना प्रत्येकी ७५०० रुपये प्रमाणे १५००० रुपये स्वरुपात चेक देण्यात आली होती. यावेळी गट विकास अधिकारी पंचायत समिती सी.टी.गोसवी, विस्तार अधिकारी किरण गावित, ग्रामसेवक बिलगांव डी.एस.पाटील, जामसिंग पावरा, सरपंच बिलगांव पिंट्या पावरा, सरपंच शेलकुवी जोहरू पावरा, शिक्षक बिलगांव गोटु पावरा, ग्रामपंचायत सदस्य बिलगांव भरत पावरा पंचायत समिती कर्मचारी वृंद ग्रामस्थ मदत देता वेळी उपस्थित होते.