सिद्धोधन घाटे
जिल्हा प्रतिनीधी, बीड
बीड : दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४
रिपब्लिकन युवा सेनेच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी अंबाजोगाईचे आजय रामकिसन गोरे यांची फेरनिवड करण्यात आली.
रिपब्लिकन युवा सेनेच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी अंबाजोगाईचे आजय रामकिसन गोरे यांची फेरनिवड करण्यात आली असून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्य तसेच सर्व सामान्याना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे अन्ायाविरुध्द आवाज उठवणारे आणि आपल्या सामाजिक कार्यातून नेहमीच चर्चेत असणारे अजय गोरे यांच्या कार्याचा आढावा घेत रिपब्लिकन युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सर सेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशावरून पुन्हा एकदा तिसर्यांदा आजय रामकिसन गोरे यांची बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात अली असून दिंनक १ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी नियुक्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला.