फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
ओतूर : गणेशोत्सव आवघ्या २ दिवसांवर आल्याने ओतूर बाजारपेठेत झगमगाट सुरू झाला आहे. सजावट साहित्याची रेलचेल वाढली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक हार-फुलांची मांदियाळी दिसत असून खरेदीही जोमात क्षहोत आहे. या प्लास्टिकच्या अतिमागणीमुळे उत्सवासाठी कष्टाने फुलबागा फुलवणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणपती बप्पाचा उत्सव जवळ आल्याने सर्व गणेश भक्त व सार्वजनिक मंडळे उत्सवाच्या तयारीने वेग धारण केला आहे. गणेशभक्तामद्ये आगमनाची आतुरता लागली असून बाप्पाचे वाजत गाजत दणक्यात स्वागत करण्याचे बेत गणेशभक्तांमधून आखले जात आहेत, सध्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये रंगेबिरंगी लाइटिंगच्या माळांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यामुळे दुकानांमध्ये ग्राहकांची रेलचेल पाहायला मिळत आहे इलेक्ट्रॉनिक साहित्यांसह प्लास्टिक हार, फुलांसह कापडी साहित्यही उपलब्ध असून गणेशोत्सवासाठी ओतूर बाजारपेठेतही घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळे बापाच्या सजावट साहित्याची रेलचेल वाढल्याने विविध प्रकारचे पुष्पगुच्छ,पताका, तोरणांची गणेश भक्तांकडून खरेदी होत आहे. प्लास्टिक हिरवळीचे छत,लाईट माळा यांना प्राधान्य दिले जात आहे.एकीकडे स्वदेशीचा नारा दिला जात असला तरी बाजारपेठेत मात्र चायनामेड इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचा झगमगाट होत आहे. बाजारपेठेत विक्रीसाठी प्लास्टिकची फुले व हार यांची रेलचेल झाली असून इलेक्ट्रॉनिक साहित्यही लक्ष वेधून घेत आहे त्यामुळे त्याची मागणी मोठी होत आहे.

