सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
आळेफाटा : आळेफाटा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या बेल्हे पोलीस दुरक्षेत्राचे कर्मचारी बेल्हे परिसरात शुक्रवार(दि.२४) रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बेल्हे- बोरी रोड शिवनेरीवाडी रस्त्याच्या कडेला बाभळीच्या झाडाखाली पाच जनवारे असा एकूण ५६ हजार रुपयांचा माल जप्त करून दोन इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार विकास गोसावी त्यांच्या सहकाऱ्यांसह बेल्हे-बोरी रस्त्याला शिवनेरीवाडीजवळ असताना दुपारी१वा. सुमारास पाच जनावरे केली जप्त पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार बेल्हे बोरी रस्त्यावर असणाऱ्या शिवनेरीवस्ती शेजारी बाबळीच्या झाडाखाली पाच जनावरे, पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता बांधलेली होती.काळे पट्टे व पांढऱ्या रंगाचा असे दोन बैल तर,तांबडी बांडी,काळी बांडी,सफेद रंगाच्या अशा तीन कालवडी एकूण ५ जनावरे आढळून आल्यावर त्या कत्तलीसाठी नेणार असल्याचे समजले, पोलीस हवालदार विकास गोसावी यांनी ताबडतोब जनावरे जप्त करून आळेफाटा पोलीस ठाण्यात नेली मुजाहिद महमूद इनामदार रा.जुन्नर (ता.जुन्नर) विशाल भाऊ चाटे रा.शिवनेरवाडी बेल्हे (ता.जुन्नर) या दोघा विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा व महाराष्ट्र प्राणी संरक्षण (गोवंश हत्या बंदी) कायद्यानुसार सचिन लहानु राहणे यांनी फिर्याद दिली. असून पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे हमलदार पंकज पारखे,पोलीस हवालदार विकास गोसावी पुढील तपास करत असून पोलिसांनी सदर पाच जनावरे संगमनेर येथील जीवदया पांजरपोळात पाठवण्यात आली आहे.