संदिप टुले तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड तालुक्यातील एकेरीवाडी येथे दि.19 रोजी शिवजयंती निमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर व कोटक महिंद्रा सिक्युरिटीज लिमिटेड च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकेरीवाडी व जिल्हा परिषद शाळा हंडाळवाडी या दोन शाळेना सर्व उपयोगी दिड लाख रुपयांचे प्रत्येकी एक कलर प्रिंटर देण्यात आला या प्रिंटर चे वितरण बाजार समितीचे मा सभापती दिलीप हंडाळ व एकेरीवाडीच्या प्रभारी सरपंच सौ निर्मला सतिश टुले यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकडे करण्यात आले.यावेळी दोन्हीही शालेय शिक्षण समितीच्या वतीने जागतिक रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अभ्यंकर व रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर च्या अध्यक्षा डाॅ.स्मिताताई जोग यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी बोलताना मा सभापती दिलीप हंडाळ म्हणाले की रोटरी क्लब ही जगातील एकमेव स्वतः पैसे खर्च करून समाजसेवा करणारी संस्था आहे. रोटरी क्लब पुणे च्या वतीने मागील अनेक वर्षात दौंड तालुक्यामध्ये अनेक समाज उपयोगी व विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून सहकार्य केले आहे. तसेच अनेक जिल्हा परिषद शाळेतील खेड्यातील मुलींना मोफत सायकलीचे ही वाटप हा एक रोटरीचा उल्लेखनीय उपक्रम आहे. तसेच मागील वर्षी एकेरीवाडी शाळेला फिल्टर देत विद्यार्थ्यांचा शुद्ध पाण्याचा मोठा प्रश्न सोडवत एक पुण्याचे काम केले होते. यावेळी दौंड खरेदी विक्री चे माजी संचालक शंकर टुले माजी उपसरपंच सतीश टुले, केंद्र प्रमुख संजय चव्हाण, मुख्याध्यापक सुहास चौधरी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुदाम टुले, उपाध्यक्ष अमोल शेळके, संजय टुले,अर्जुन टुले,सुरेश थोरात, शिक्षक ,प्रदीप वाघोले,राजकुमार मोरे,मधुकर गिरमे,महादेव पंडित, अंजली पंडित, मनिषा माने महारनवर मॅडम आधी उपस्थित होते.