स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
( शिरूर ) : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील “पैलवानांचं गाव ते अधिकाऱ्यांचं गाव” अशी ओळख असणाऱ्या पिंपळे खालसा या गावामध्ये सन १९६९/७० च्या इयत्ता सातवीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ५४ वर्षानंतर पुन्हा एकदा पिंपळे खालसा गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये वर्ग भरला.त्याकाळचे त्यांचे शिक्षक श्री नरसिंगराव नारायणराव पलांडे गुरुजी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व माजी विद्यार्थ्यांचे नातेवाईक आणि पिंपळे खालसा गावातील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी , ग्रामस्थ आणि महिला मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली,विद्येची देवता सरस्वती,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच १४ में रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने परिसर अक्षरशः दुमदुमला,गावातील तरुण मित्रांनी आणलेल्या ज्योतीचेही महिलांनी पुजन केले,सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्या काळातील प्रार्थना आणि परिपाठ मा.शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केला त्यांना तबला वादक काशिनाथमामा गोडसे, बाळासाहेब आनपट,वसंत आनंदराव धुमाळ पाटील, अनुसया मारुती सुरसे मामी यांनी प्रार्थनेला साथ दिली यावेळी १९६९/७० चे माजी विद्यार्थी अरूण दगडु झेंडे,बाळसाहेब गजाराम धुमाळ,पोपट तुकाराम धुमाळ,संभाजी बाजीराव धुमाळ,रघुनाथ चंदरराव धुमाळ,संभाजी गुलाबराव धुमाळ,विठ्ठल बुवासाहेब धुमाळ,शहाजी शंकरराव धुमाळ,शहाजी आनंदराव धुमाळ,गोविंद दौलतराव शेळके,भाऊसाहेब माधवराव शेळके,जयसिंग माधवराव शेळके,बाळासाहेब दत्तोबा धुमाळ,पांडुरंग लक्ष्मण परभाणे,पोपट हरिभाऊ झेंडे,मारूती परशुराम सुरसे(मामा),सौ.गुणाबाई (सुनिता)जगन्नाथ हिंगे,सौ.लताबाई महिपतराव गरूड,सौ.शकुंतला बाळासाहेब काळे,सौ.रत्नाबाई संभाजी शिंदे आदि उपस्थित होते.तसेच यावेळी दिवंगत माजी विद्यार्थी हनुमंत मारूती धुमाळ,शहाजी माधवराव धुमाळ,भाऊसाहेब बाबुराव धुमाळ,शालन बाळासाहेब आवटे यांना सर्वांनुमते भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे शिक्षक श्री नरसिंगराव नारायणराव पलांडे गुरुजी माजी मुख्याध्यापक पिंपळे खालसा यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.यावेळी गुरूवर्य शिक्षक पलांडे गुरूजी अध्यक्षीय भाषणात बोलताना जुन्या आठवणीना उजाळा देत भावुक झाले.यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी त्याचे मनपुर्वक कौतुक केले. पत्रकार रिजवान बागवान यांनी गायलेल्या गितांमुळे कार्यक्रमाला रंगत आली.सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित सर्वांना सुरुची भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश धुमाळ पाटील ,संपत कांतीलाल धुमाळ पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी मारुती मामा सुरसे यांनी केले आणि आभार माजी विद्यार्थी बाळासाहेब दत्तोबा धुमाळ गुरुजी यांनी मानले.