शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू :सेलू तालुक्या तील देऊळगाव गात येथील परिसरात दिनांक 13 व 14 मे रोजी सायंकाळी सहा वाजता झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांना सावली पासून मुकावे लागले तर या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. देऊळगाव गात शिवारातील ज्ञानोबा लिंबाजी काळे यांच्या शेतातील गट नंबर 260 मधील वादळी वाऱ्यामुळे सोलार प्लेटचे नुकसान झाले असून 9 सोलार प्लेटा पूर्णतः मोडकळीस आल्या आहेत. देऊळगाव गात येथील तलाठ्याने पंचनामा केला असून ऐन उन्हाळ्यात मुक्या जनावरांची व पशुधनाची पाण्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्याची लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी सर्वत्र मागणी होत आहे.











