बबनराव धायतोंडे जिल्हा प्रतिनिधी पुणे
दि. (३०)रोजी दौंड येथील प्राईम स्क्वेअर हॉटेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पार्टीची आढावा बैठक पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष,जगन्नाथ शेवाळे,कार्याध्यक्ष महादेव कोंढरे,दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.या बैठकीमध्ये दौंड तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या सूचना तसेच येणाऱ्या विधानसभेमध्ये पक्षाची रणनीती कशा प्रकारे करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संपूर्ण उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आप्पासाहेब पवार यांना विधानसभेची उमेदवारी द्या अशी एकमुखी मागणी केली.तसेच नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दौंड तालुक्यातील यशाबद्दल उपस्थित सर्व पदाधिकारी आणि बूथ कमिटीतील कार्यकर्त्यांचे अभिनंदन महादेव आण्णा कोंढरे यांनी केले. या बैठकीसाठी नामदेव ताकवणे,सोहेलभाई खान,रामभाऊ टुले,उदयजी फडतरे,अजित शितोळे,सचिन गायकवाड,सचिन काळभोर,मनीषा सोनवणे,योगिता जोंधळे,पूर्वा शहा,असिफ शेख,श्रेयस सोनवणे,शुभम दोरगे,दिपक पारदासानी,चैतन्य पाटोळे,मंगेश गायकवाड ईत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दौंड तालुक्यातुन सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या मताधिक्यामुळे दौंड तालुक्यातील जनतेचे आभार जगन्नाथ बापू शेवाळे यांनी मानले.