नागनाथ भंडारे सर्कल प्रतिनिधी, आरळी
कुंडलवाडी : शहरातील मारोती मंदिर ते धर्माबाद रोडलगत व्यंकटेश्वर कमानीपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गड्डूवार यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कुंडलवाडी शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे सून याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याच अनुषंगाने शहरातील मुख्य बाजारपेठेतील जोड मारोती मंदिर ते धर्माबाद रोडलगतच्या व्यंकटेश्वर कमानीपर्यंत रस्त्यावर अनेक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणत रहदारी असून अतिक्रमणाचा फटका वाहनचालक व नागरिकांना बसत आहे. त्यामुळे सदरील रस्त्यावर नवीन सीसी रस्ता होण्यापूर्वी रस्त्यावरील अतिक्रमणे पालिका प्रशासनाने तत्काळ काढून रहदारीसाठी रस्ता मोकळा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गट्टवार यांनी मुख्याधिकारी आर. जी. चौहान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अतिक्रमणे न हटविल्यास पालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा गड्डूवार यांनी प्रशासनास दिला आहे.


