गावात अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता
बबनराव धायतोंडे
पुणे जिल्हा प्रतिनिधी
दौंड :- खानवटे ता. दौंड येथे स्वयंभू कोयता गँगने भलतेच डोके वर काढले असून सार्वजनिक ठिकाणी व गावातील शाळेच्या ठिकाणी या कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. हे गावातील टवाळखोर शाळा भरतेवेळेस रस्त्यालगत मंदिरात थांबून मोठ्याने गाणी म्हणणे आणि संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मुलींच्या मागे मोटरसायकल वरून हेलपाटे मारत असतात. मुली रेल्वे मोरीच्या खालून जात असताना वरून आरडा- ओरडा करत असतात.त्यामुळे मुलींच्या आणि पालकांच्या मध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे..या स्वयंभू गँगचा तात्काळ बंदोबस्त जर झाला नाही तर गावात एखाद्या मुलीच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशी गावात मोठी चर्चा जोरात चालू आहे.ही कोयता गॅंग मोटरसायकल वरती राजरोस कोयता घेऊन फिरत आहेत. व मुद्दाम वाद करून लगेच कोयता दाखवून दहशत माजवत आहेत. या मुलांचे वय १७ ते १९ पर्यंत असून ते कोणत्याही लहान थोर मंडळींचा विचारही करत नाहीत. आणि मान राखत नाहीत. आणि बेधडक खून करण्याची भाषा वापरत आहेत. तसेच या कोयता गँगच्या दहशतीमुळे गावातील व शाळेतील वातावरण कमालीचे दूषित झालेले आहे.या कोयता गँगने शाळेतील शिक्षकांनाच मर्डर करण्याची भाषा वापरली आहे. त्यामुळे या कोयता गँगचा गावात कहर झाला आहे.त्यामुळे या कोयता गँगचा वेळीच बंदोबस्त जर झाला नाही तर गावात मोठी अराजकता माजेल असे काही गाव पुढाऱ्यांनी बोलून दाखवले.
चौकट..
वेळीची कोयता गँगचा बंदोबस्त झाला नाही तर गावाला गाव पण राहणार नाही आणि गावाचे वातावरण प्रचंड दूषित झाले असून याचा दौंड पोलीसांनी बंदोबस्त करावा.
दिपकराव ढवळे तंटामुक्ती अध्यक्ष खानवटे .
चौकट..
गावात ताबडतोब ग्रामसभा घेऊन या कोयता गँगचा बंदोबस्त करण्यासाठी नियोजन करण्यात येईल सौ. अंजली ढवळे सरपंच खानवटे.
चौकट..
शाळेध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आणि स्वयंभू कोयता गॅंग ने डोके वर काढले असून याचा तात्काळ बंदोबस्त झाला पाहिजे. गावातील वातावरण दूषित करणे हा प्रकार गावासाठी चांगला नसून हे ताबडतोब थांबले पाहिजे सौ. उर्मिला गायकवाड पोलीस पाटील खानवटे..