सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव :- 10 जानेवारी 2024 रोजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे ‘विश्व हिंदी दिनाचे ‘आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन. शिंदे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मानवी जीवनात भाषेचे महत्त्व तसेच मानवाला स्वतःच्या विकासासाठी अनेक विदेशी भाषा शिकणे व भाषांतर कलांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात. तसेच प्रसारमाध्यमांमध्ये भाषाचे योगदान मोठे असते. म्हणून विविध भाषांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे बहुमोल मार्गदर्शन केले .महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.ए. मराठे यांनी विश्व हिंदी दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राठोड यांनी केले तर आभार प्रा.श्रीमती बी.बी धोंगडे यांनी मानले