राजकुमार पंचडे शहर प्रतिनिधी उदगीर
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, स्टाफ सेक्रेटरी ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार, दिनविशेष समितीचे प्रा.डॉ. संजय सोमवंशी यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.