सुरेश नारायणे तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मार्च रोजी नाशिक येथील पलास सभागृह गुरुदक्षिणा संकुल कॉलेज रोड नाशिक येथे दुपारी अडीच वाजता संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन नांदगाव येथील अलका सुरेश नारायणे यांना वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारअसल्याची घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.या पुरस्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या लोकप्रिय पोलीस उपायुक्त माननीय मोनिकाजी राऊत. मिसेस इंडिया इंटरनॅशनल2024 ज्योती शिंदे. नाळ चित्रपटाच्या नायिका व लोकप्रिय अभिनेत्री देविका दप्तरदार. सामाजिक कार्यकर्त्या डॉ आशाताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कृतिका मराठी यांनी केले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)