हनुमान बर्वे शहर प्रतिनिधी वाशिम
नाका कनेरगाव रेल्वे स्टेशन जवळ सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्या संदर्भात रास्तारोको आंदोलन.सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणी तातडीने पूर्ण करा नसता यापुढे राजकीय पुढाऱ्यांना फिरकु देणार नाही मराठा समाजाच्या वतीने इशारा.राष्ट्रीय मार्गावर तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते वाशीम राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे स्थानकासमोर दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी एकदिवसीय रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा बाजी व छत्रपती शिवाजी महाराजाचा जयजयकार करीत घोषणाबाजी करत आमच्या मागण्या अधिवेशनात मंजूर करून मराठा समाजाला आरक्षण तात्काळ देऊन सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणी तातडीने पूर्ण करण्यासाठी हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले परंतु जर सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणी केली नाही तर यापुढे आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा आंदोलनात देण्यात आला सकाळी दहा वाजता दरम्यान रास्तारोको आंदोलन करण्यात आले व तब्बल दोन तासांच्या जवळपास मराठा समाजाचे बांधव हे रस्त्यावर आपलं ठाण मांडून बसले होते रास्तारोको आंदोलनात मात्र मराठा समाजाच्या वतीने आंदोलन असताना सुद्धा अबुंलसला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला शालेय विद्यार्थीना अडचणी निर्माण होतील असे आंदोलन करण्यात येणार नाहीत परीक्षा जवळ येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ देणार नाहीयावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना बर्याच आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जर आम्हाला तात्काळ आरक्षण व सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणी तातडीने पूर्ण करा अशी मागणी केलीशासनाने तात्काळ सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणी तातडीने पूर्ण करावी अशी मागणी केली आहे तब्बल दोन तास चाललेल्या रास्तारोको आंदोलनाच्या घटनास्थळी हिगोली चे नायब तहसीलदार खंदारेमंडळ अधिकारी एन डी नाईक, तलाठी मोनाली गोटे यांनी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले अनेक गावांतील सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर व उपनिरीक्षक आघाव, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस कर्मचारी होमगार्ड, महीला होमगार्ड कर्मचारी यांच्या कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.