संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी घाटंजी
घाटंजी : शहरामध्ये वाढत्या अतिक्रमणाची मोठी समस्या निर्माण झाली असून रस्त्यालगत विविध व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत.व्यवसायीक आपल्या दुकाना समोर सामान व आपली वाहने रस्त्यावर ठेवतात दुकानात येणारे ग्राहक सुद्धा रस्त्यावर वाहने उभी ठेवत असल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. रहदारीस रस्ता अरुंद होत असल्यामुळे कितेकदा अपघात व वादविवादाच्या घटना घडत असतात यासंपूर्ण बाबी कडे सां बां विभाग, नगर परिषद, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे निष्क्रिय यंत्रनेमुळे अतिक्रमण धारकांचे चांगलेच फावले वाढले आहे. सा. बा. विभागाअंतर्गत येणाऱ्या घाटंजी येथील बसस्थानक चौकात रस्त्यावर खाजगी प्रवासी वाहने, व दोन्ही बाजूंनी फुटपाथवर अतिक्रमना मुळे मोठा अपघाताची होवू शक्यता एस.टी. महामंडळाच्या पांढरकवडा व यवतमाळ रोड ने बस पलटवितांना चालकाला खूप त्रास सहन करावा लागत आहेत.तर दुसरीकडे नगर परिषद अंतर्गत यवतमाळ नाका ते पोलिस स्टेशन चौका पर्यंत सिमेंट रोड ने दोन्ही बाजूंनी फुटपाथ हे अतिक्रमण धारक दुकानदारांच्या ताब्यात गेल्यामुळे पादचारी चालणा-या लोकांना जिव मुठीत धरून चालावे लागतात.आणी पोलिस स्टेशन ते शिवाजी चौक रस्ता अरुंद असतांना व्यावसायिक यांच्या दुकानापुठे टु व्हिलर, फोर, व्हिलर गाड्या रस्त्यावर उभ्या करून ट्राफिक जाम करतांना दिसून येतात.अग्रसेन चौक, टेलर लाईन,ते इंदिरा चौक पर्यंत रोडचे लोकप्रतिनिधींनी भुमिपूजन केले.पण फक्त गिट्टीचे मोढे ढीगारे टाकल्यामुळे कुषी केंद्रात जाण्याचा रस्ता बंद झाला आहे.त्या रस्तावर किरकोळ अपघात होतांना दिसून येत आहे.व पोलिस स्टेशन ते इंदिरा चौक, जामा मस्जिद कडे जाण्याच्या मार्गावर न.प.काॅम्लेक्स समोर फळे विकणा-या हातगाड्यानी अर्ध्या रस्त्यावर अतिक्रमण करून ताब्यात घेतला.व मंगळवारी शहरातील बाजाराच्या दिवशी दुकाने लावण्याकरिता बाजारात भरपूर जागा शिल्लक असतांना सुद्धा आतमध्ये दुकाने न लावता रोडवर दुकाने लावून चारही बाजूंनी रस्तावर दुकाने लावून रस्ते बंद करतात प्रशासनाचे दुर्लक्ष का संमती हे कळेनासे झाले आहे.रस्त्यालगत विविध व्यावसायीकांनी आपले अतिक्रमण करून व्यवसाय थाटले. वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होऊन अघोषित रास्तारोकोची परिस्थिती रस्त्यावर होत असल्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळबंते रहदारीस रस्ताच मिळत नाही रस्त्यावर उभे राहणाऱ्या छोट्या मोठ्या वाहना मुळे वाहतुकीचा खोळबां होतो त्यामुळे कित्येकदा अपघात तथा वादविवादाच्या घटना ही घडतात अवैध प्रवासी वाहतुक करणारी वाहने, अंतर्गत मालवाहु वाहने यांचा ही मोठा गराडा रस्त्याच्या मधोमध उभे राहत असल्यामुळे सामान्य नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे रस्त्यावर उभी राहणाऱ्या वाहनामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतुक झालेली दिसते वाहतुकीची कोंडी होते. वाहुतुकीच्या कोंडीमुळे एखाद्या वेळेस मोठा वाद निर्माण होऊन शहराची शांतता भंग होऊ शकते.नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या जुने बसस्थानक परीसर, पोलिस स्टेशन चौक रस्त्यावरील हातगाडी वरील भाजीपालेवाले फळ विक्रेते अन्य साहीत्य विक्रेते रस्त्यावरच अतिक्रमण करीत असल्यामुळे कधी कधी रस्त्यावर अघोषीत रस्ता रोको होवुन पादचारांना चालणे सुद्धा मुश्कील होते. या ठिकाणी सुद्धा वादावादीच्या घटना घडतात परंतु वाहतुक शिपाई कधीच हा प्रश्न सोडत नाही. नगर परीषद प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना लाडावुन ठेवले आहे.नगर परीषद प्रशासनाचे दैनंदिन वसूलीवरच लक्ष केंद्रित असुन वाहतुक समस्येकडे दुर्लक्ष होत आहे एकंदरीत नगर परीषद प्रशासन आजपर्यंत सुस्त होती नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी तथा प्रशासन राजू मोट्टेमवार व सा.बां. विभागाने, आणी पोलीस प्रशासनाने लक्ष न दिल्यास मोठा अपघात होवू शकतो.नवीन व्यावसायिकांनी जागा मिळेल त्या ठीकाणी आपली दुकाने थाटली आहेत.वाहतुक शिपायांनी पोलीस स्टेशन समोरच न राहता शहरातील वाहतुक व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे घाटंजी शहरात वाढलेल्या अतिक्रणाकडे सा.बां. विभाग, नगर परिषद, पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करून अतिक्रमण मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.


