सुमेध दामधर
ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा : येथील १४ वर्षीय मुलगा गौरव संतोष वानखडे याला शुक्रवार २४ मे रोजी सकाळी ०९:३० वा. विद्युत तारेचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोनाळा येथे टुनकी रोडवर मटन मार्केट आहे हा मुलगा कबूतर पकडण्यासाठी मार्केटच्या टिन शेळ वर चढला होता व कबूतर पकडण्यासाठी हात वर केला असता, तिथून हेवी विद्युत लाईनच्या तारा जवळ असल्याने त्याला अचानक स्पर्श झाल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. शॉक लागताच त्याला जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी लगेच वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. त्यामुळे संपूर्ण गावावर एकच शोककळा पसरली. याबाबत तामगाव पो.स्टे. ने दिलेल्या माहितीनुसार असे की, ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथील शिपाई अक्षय अनिल लहाने त्याबाबतचा बाऊड डेथ चा मेमो ५७८/२४ मेमो सादर केला की, ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे उपचारासाठी गौरव यास दाखल केले असता, वैद्यकिय अधिकारी डॉ. खान यांनी त्याला मृत घोषित केले. गौरव नुकताच इयत्ता सातवी पास झाला. त्याची परिस्थिती ही अत्यंत हलाकीची असून आई नसल्याने त्याचे पालन पोषण काका करीत होते. वडील हे केरळमध्ये कंपनीत काम करण्यासाठी गेले आहेत. मुलाचा पंचनामा करून डॉक्टरांनी शव विच्छेदन केले. ही घटना सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत असल्याने याबाबतचा मेमो सोनाळा पो.स्टे. ला पाठवण्यात आला आहे. शव विच्छेदन नंतर ०५:०० वा. गौरव वर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आला.


