सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
सातपुड्याच्या पर्वताच्या पायथ्याच्या वसलेले डोंगरात तळोदा तालुक्यातील कुलीडाबर हे आदिवासी लोकवस्तीचे गावं आहे. गावात सुमारे ४० घरे असुन ३०० च्या जवळपास लोकसंख्या आहे एक विहीर मार्च महिन्यांतच कोरडे ठक आहे दुसऱ्या विहीरीचे पाणी देखील आटले आहे. विहिरीतील एका झऱ्यातून थोड पाणी येत छोट्यांच्या डबक्यात साचते विहीरीत उतरुन क्रमाने येणाऱ्यांचे हंडे कर्मानुसार लावते ती महिला खाली उतरून झरातुन निघणारे पाणी मग डब्याच्या साह्याने हंड्यात भरते तो हंडा वर महिले कडे पोहोच करते. विहिरीतून जीव धोक्यात घालून कसरत करावी लागत आहे.


