सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा :- संग्रामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंधांना उत आला असून, त्यामध्ये सर्रास अवैध दारूची विक्री होत आहे. प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला दिसत नाही. असे दिसून येत आहे. संग्रामपूर तालुक्यातील ४ जुलै २०२४ पासून उपोषण करणार असल्याचे निवेदन राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शेख कदीरभाई यांनी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिला आहे. निवेदनात नमूद केले आहे की संग्रामपूर तालुक्यात धंदे जसे वरली, मटका, प्रत्येक शासकीय सुट्टीच्या दिवशी काही बिअर बार चालक दारूची सरास विक्री करतात. तालुक्यात गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात चालत आहे. भर दिवसा वाहनाद्वारे दारूच्या पेट्या गावाकडे पोहोचल्या जातात. अवैध दारूचा व्यवसाय होत असल्याने ग्रामीण भागातील तरुण व्यसनाधीन झाले असून गरिबांचे संसार उध्वस्त होताना दिसत आहेत. तरी अवैध धंदे तात्काळ बंद करावे अन्यथा ४ जुलै २०२४ पासून तामगाव पोलीस स्टेशन समोर उपोषण करणार असल्या चा इशारा शेख कदिरभाई यांनी निवेदनातून दिला आहे. या मागणीला संग्रामपूर तालुक्यातील युवा स्वाभिमान पार्टी कडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. संग्रामपूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा तसेच निवेदन कर्त्याना पाठिंबा देऊन उपोषणाला बसण्याचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीचे संग्रामपूर तालुका अध्यक्ष रवी देवराव सोळंके यांनी तामगाव पोलीस स्टेशनला निवेदनातून म्हटले आहे.