शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
७० वर्षापासून नव्हता कर्परा नदिवर पूल आणि रस्ता-मूख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूल 256 कोटी रुपये मंजूर-आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांचा पूढाकार.सेलू: मागील ७० वर्षापासून पूलासाठी सावंगी (पि.सी.)येथील नागरीकांचे हाल होत असतांना मात्र मूख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पूढाकारमूळे पूल मंजूर झाला असल्याने सावंगीकरांचा पूल आणि रस्त्यासाठीचा वनवास संपला आहे. मूख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २५६ कोटी रूपयाचा निधी रस्ते व पूलांसाठी मंजूर झाला असून शनिवार १ रोजी सदरिल रस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे.यावेळी डाँ.संजय रोडगे,दिनकर वाघ,अँड.दत्तराव कदम,माऊली ताठे,दिनकर पडघन,अनिल पवार,गणेश काटकर,सूंदर गाडेकर,भारत इंद्रोके,मयूर वाघ,भागवत दळवे,बाळू आघाव,नारायण ताठे,प्रकाश ताठे,लक्ष्मण ताठे आदींची उपस्थिती होती.मागील ७० वर्षापासून सांवगी पि.सी.ला जोडणारा रस्ता व पूल नसल्याने नागरीकांना पावसाळ्यामध्ये पाण्यात प्रवास करावा लागत होता.सदरिल रस्त्यामूळे खैरी, गिरगाव,निरवाडी व चारठाणा आदी गावांना जाण्यासाठी चा प्रवास सूखकर होणार आहे.आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून पाठपूरावा करून राज्य सरकारकडून रस्त्या साठी निधी मंजूर करून घेतला आहे. रस्त्या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी दशरथ ताठे,भगवान ताठे,यशवंत ताठे,उद्धवराव थिटे,पंडीत खवने,लक्ष्मण चाळक,लक्ष्मण ताठे,गणेश ताठे,हरिओम ताठे,कल्याण ताठे यांच्यासह गावक-यांनी पूढाकार घेतला.











