सुदर्शन गोवर्धन
तालुका प्रतिनिधी सावली
दि.17/10/2024
सावली: सावली तालुक्यातील सोनापुर येथे ढीवर, भोई, केवट समाजाच्या वतीने रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला वाल्मीकी ऋषीच्या मंदिरातून सजवलेल्या वाहनावर महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीधर सोनुले अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, दिनकर वाघाडे उपाध्यक्ष से. स.सोसायटी, रोशन गुरनुले तालुका उपाध्यक्ष माळी समाज संघटना सावली, यांच्या हस्ते करण्यात आले आणि मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील ढीवर, भोई, केवट समाजातील महिला, पुरुष, तरुण, तरुणी, बाल-गोपाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकीत बॅन्ड ढोलच्या तालावर लक्षवेधी ठेका घेतला होता. ढोल्याचा चौक, सम्राट अशोक चौक, गांधी चौक, फुले चौक, ग्रामपंचायत भवन मार्गातून ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, ते हनुमान मंदिर ते पुन्हा वाल्मीकी ऋषीच्या मंदिरापर्यंत मिरवणुकिची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटिका जयश्री मडावी सरपंच ग्रा.प. सोनापुर,
कार्यक्रमाचे अध्यक्ष डोमाजी शेंडे मा.संचालक कृ.ऊ.बा.स. सावली ,कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे लीलाबाई मौजे अध्यक्षा तं.मू.गा.स.,श्रीधर सोनुले अध्यक्ष शाळा व्य.समिती, दिनकर वाघाडे उपाध्यक्ष सेवा स.सोसायटी, प्रकाश नागापूरे सदस्य ग्रा. पं, नामदेव सोनुले सदस्य ग्रा. पं, दामोधर मेश्राम अध्यक्ष धीवर समाज,माणिक मौजे उपाध्यक्ष धीवर समाज, तुळशीदास मेश्राम,विलास भोयर तसेच कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मा.संचालक कृ ऊ.बा.स सावली डोमाजी शेंडे यांनी वाल्मीकी ऋषींचे कार्य व योगदानाबाबत सर्व समाजबांधवांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रोशन गुरनूले तालुका उपाध्यक्ष माळी समाज संघटना सावली यांनी केले.