शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा सेलू येथे कार्यक्रम संपन्न.
सेलू : दि. 19 ऑक्टो. शनिवार रोजी सेलू शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत पर्यावरण पूरक आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्या ध्यापक किरण बोराडे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पौळ कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक कला शिक्षक पांडुरंग पाटणकर, सहशिक्षक विजय सोंजे आदी उपस्थित होते. प्रास्ता विक मंजुषा जगदाळे यांनी केले.कला शिक्षक पांडुरंग पाटणकर यांनी उपस्थित 100 विद्यार्थ्यांना पर्याव रणाचे महत्त्व तसेच प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कागदा पासून विविध प्रकारचे छोटे छोटे आकाश कंदील कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. बालकांनी कृती युक्त सहभाग नोंदवला आभार मुख्याध्यापि का सालेहा परवीन यांनी मानलेकार्यशाळा यशस्वीतेसाठी सह शिक्षिका अविद्या गाडे, रेशमा बेगम मंजूर, सय्यद रहिल्याबाजी, कमल काळे यांनी परिश्रम घेतले.